
बायफ संस्थे अंतर्गत मेडपल्ली येथील शेतकऱ्यांना गांडूळ खत बेडचे वाटप.
पेरमिली(गडचिरोली):- अहेरी तालुक्यातील मेडपल्ली गावातील शेतकऱ्यांना दिनांक 21 ऑगस्ट रोजी वर्मी बेडचे वितरण करण्यात आले. भगवान मडावी, मारोती पेन्दामा, सिताराम मेश्राम, दादाजी बावने , नामदेव पेंदाम, या लाभार्थी शेतकऱ्यांना वर्मी बेड देण्यात आले असून हा उपक्रम अती प्रभावित मेगा पाणलोड प्रकल्प अंतर्गत भारतीय ग्रामीण उपजीविका प्रतिष्ठान दिल्ली ऑक्सिस बँक व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी तालुक्यातील 20 ग्रामपंचायत मधील 69 गावात प्रकल्पाचे काम सुरू केले आहे या प्रकल्प खाली खरीप हंगामा 2025- 26 मध्ये 140 धानाचे डेमो धारक लाभार्थी व 36 भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या आजीविकेचा विकास व शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे.दरम्यान शेतकऱ्यांना वर्मी बेडची आवश्यकता, गांडूळ खताची निर्मिती प्रक्रिया आणि त्याचा शेतीतील उपयोग यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात व गांडूळ खत उत्पादन हे सेंद्रिय शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, सेंद्रिय पदार्थांची वाढ होते आणि उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वर्मी बेडचा वापर कसा करायचा याची माहिती देण्यात आली . या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला. वर्मी बेडचा वापर केल्यास त्यांना उच्च दर्जाचे गांडूळ खत मिळेल, त्यामुळे रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होईल आणि शेती अधिक शाश्वत बनेल. यातून त्यांना आर्थिक सक्षमता मिळण्यास मदत होईल व आजच्या बेसुमार रासायनिक खतांचा वापर करण्याच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातून विषमुक्त अन्न तयार होवून शेतकऱ्यांचे आरोग्य सुधारेल असे मनोगत बायफ संस्थेचे प्रकल्प अधिकारी कुडे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमात प्रस्तावना केंद्र समन्वयक अलका तलांडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रेरक बाबुराव तलांडी व संजय आत्राम यांनी परिश्रम घेतले.
ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल असून शेतकऱ्यांना सशक्तीकरण, पर्यावरणपूरक शेतीचा विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची उन्नती या तिन्ही दिशांना हा उपक्रम प्रेरक ठरेल.