राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
सुरजगड इलाका तेंडू लिलावाची बिगुल; जांबिया येथे तीन टप्प्यांत लिलाव

एटापल्ली (प्रतिनिधी) : मौजा डोदुर येथे दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या बैठकीत सुरजगड इलाक्यातील तेंडू संकलन लिलावाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीनुसार तेंडू संकलनाचा लिलाव मौजा जांबिया येथे तीन टप्प्यांत घेण्याचे निश्चित करण्यात आले असून सर्व कंत्राटदारांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पहिला लिलाव 16 मार्च 2026 (सोमवार) रोजी सकाळी, दुसरा लिलाव 26 मार्च 2026 (शुक्रवार) रोजी आणि तिसरा लिलाव 06 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या बैठकीस सुरजगड पट्टीतील सुमारे 70 गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेंडू संकलन प्रक्रिया पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यावर सर्वानुमते भर देण्यात आला.
⭐ मान्यवरांची उपस्थिती
सम्मा जेट्टी — सल्लागार, सुरजगड ग्रामसभा
कन्ना गोटा — पोलीस पाटील, गट्टा
देवू हिचामी — सचिव, ग्रामसभा
बंडु दोरपेटी — उपाध्यक्ष, ग्रामसभा
पत्तू पोटावी — जिल्हा सदस्य, ग्रामसभा
लक्ष्मण जेट्टी — सदस्य, ग्रामसभा
तसेच सुरजगड पट्टीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 बैठकीत तेंडू संकलन हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
