आलापल्लीत नव्या व्यवसायाची सुरुवात
काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते किराणा दुकानाचे उद्घाटन
आलापल्ली | प्रतिनिधी
आलापल्ली येथील मेन रोडवर, पीडब्ल्यूडी कार्यालयासमोर कोंडूम रायचंदमल किराणा मर्चेंट या नव्या दुकानाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार उपस्थित होते.
उद्घाटनानंतर अजयभाऊ कंकडालवार यांनी दुकान मालकांना शुभेच्छा देत नवीन व्यवसायासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. स्थानिक स्तरावर नव्या व्यवसायामुळे रोजगार व सेवा सुविधा वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला दुकान मालकांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, परिसरातील नागरिक तसेच स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.
