37 बटालियन कें.रि.पु.बल अहेरी येथे लाभार्थी प्रशिक्षणार्थींचा निरोप समारंभ संपन्न.
अहेरी (गडचिरोली):- सिविक ॲक्शन प्रोग्राम 2025-26 अंतर्गत 37 बटा.कें.रि.पु.बल प्राणहिता -अहेरी मार्फत चाणक्य अकॅडमी अहेरी येथे दिनांक 15 जानेवारी 2026 पासून भामरागड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी भरतीपूर्व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तथा साहित्य वाटप उपक्रम 45 दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. सदर उपक्रमाचा निरोप समारंभ दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी 37 बटा. कें. रि.पु.बल अहेरी येथे सभागृहात पार पडला. यावेळी निरोप समारंभाचे अध्यक्ष म्हणून 37 बटालियन चे कमांडेंट दव इंजीरकन किंडो आणि समारंभाचे विशेष अतिथी म्हणून 37 बटालियन चे उपकमांडेंट चन्द्रमोरे अनिल तसेच 37 बटालियन चे एस.एम.ओ वरुण मिश्रा उपस्थित होते. यावेळी लाभार्थी प्रशिक्षणार्थींना टि.शर्ट, पुस्तके, वह्या आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच 45 दिवशीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
निरोप समारंभ प्रसंगी कमांडेंट दव इंजीरकन किंडो यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे व एकाग्रतेने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविण्यासाठी संघर्ष करावी असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाणक्य अकॅडमी अहेरी चे संचालक अभिषेक बोम्मनवार यांनी केले तर आभार प्रदर्शन चाणक्य अकॅडमी चे उपसंचालिका त्रिनेत्री पुपरेड्डीवार यांनी केले. निरोप समारंभाच्या यशस्वीतेसाठी 37 बटालियन कें.रि.पु.बल अहेरीचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी सहकार्य केले.
