निर्भीड पत्रकारितेचा गौरव — एन टीव्ही मराठी चे पत्रकार आयुब शेख यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार
प्रतिनिधी |
निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजहिताच्या पत्रकारितेचा मानाचा मुजरा करत एन टीव्ही मराठीचे पत्रकार आयुब शेख यांना भिम – अण्णा संघटनेकडून प्रतिष्ठेचा ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयुब शेख यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लेखणीच्या माध्यमातून वंचितांना न्याय मिळवून देणे, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणे तसेच अनेक वेळा रक्तदानासारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग यामुळे त्यांची ओळख एक संवेदनशील पत्रकार म्हणून निर्माण झाली आहे.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की,
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे
आयुब शेख यांनी आपल्या कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली असून युवा पत्रकारांसाठी ते प्रेरणास्थान आहेत
पुरस्कार स्विकारताना आयुब शेख यांनी हा सन्मान आपल्या सहकाऱ्यांना व प्रेक्षकांना समर्पित करत, “सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे हीच खरी पत्रकारितेची जबाबदारी आहे,” असे मत व्यक्त केले.
पत्रकारितेतील निष्ठा, धाडस आणि समाजाभिमुख कामगिरीमुळे मिळालेला हा सन्मान संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
