*बाल हक्कांच्या रक्षणासाठी ग्राम बाल संरक्षण समिती व बाल पंचायत सरसावले; जिल्हास्तरीय कार्यालयांना दिली भेट*
*कोरची :- जितेंद्र सहारे*

दिनांक 20/4/2026 ला आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा आणि मिराक्ल फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने अभ्यास सहलीचे आयोजण करण्यात आले, बालकांचे संरक्षण, त्यांचे अधिकार आणि न्यायलयीन प्रक्रियेची माहिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील ग्राम बाल संरक्षण समिती (VCPC) तसेच बाल पंचायत सदस्यांनी नुकतीच गडचिरोली येथील जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU), बाल न्याय मंडळ आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाला अभ्यास भेट देण्याचे आयोजन. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील बालरक्षकांना कायद्याचे बळ आणि कार्यपद्धती समजण्यास मदत झाली आहे. ग्रामीण भागात बालविवाह, शाळाबाह्य मुले आणि बाल शोषणासारख्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी या समिती सदस्यांना प्रत्यक्ष यंत्रणेची ओळख असणे आवश्यक होते.
महत्त्वाच्या कार्यालयांना भेटी आणि संवाद
या भेटीदरम्यान सदस्यांनी विविध विभागांच्या प्रमुखांशी संवाद साधला आणि त्यांच्या कामकाजाची माहिती करून घेतली:
• जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU): येथिल अविनाश गुरनुले DCPU यांनी उपस्थित सदस्यांना अनाथ, निराधार आणि गरजू बालकांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. बालविवाह रोखणे, बालमजुरी निर्मूलन आणि ‘चाईल्ड लाईन 1098’ च्या कार्यपद्धतीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.त्याच प्रमाणे एकल माता किंवा विधी ग्रस्त बालकांसाठी बाल संगोपन योजना विषयी माहिती सांगितले.बालकांचे संरक्षण हे गावातच होऊ शकते असे म्हणाले.यासाठी ग्राम बाल संरक्षण समितीचा मुख्य रोल आहे असे सांगितले.
• बाल न्याय मंडळ (JJB): दिनेश बोरकुटे आणि देवगडे विधीसंघर्षग्रस्त बालकांबाबत असलेली न्यायलयीन प्रक्रिया आणि बाल स्नेही वातावरणात होणारे कामकाज सदस्यांनी प्रत्यक्ष पाहिले. बालकांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या सुधारणेवर कसा भर दिला जातो, हे यावेळी समजावून सांगण्यात आले.
• जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA): खानोरकर यांनी बालकांना मिळणारे मोफत कायदेशीर सहाय्य, पीडित बालकांसाठीची नुकसान भरपाई योजना आणि बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.
ग्रामीण भागात बालविवाह, शाळाबाह्य मुले आणि बाल शोषणासारख्या समस्यांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी या समिती सदस्यांना प्रत्यक्ष यंत्रणेची ओळख असणे आवश्यक होते.
“आतापर्यंत आम्ही फक्त कायद्यांविषयी ऐकले होते, पण आज प्रत्यक्ष कार्यालयांना भेट देऊन आणि अधिकाऱ्यांशी बोलून आमचा आत्मविश्वास वाढला आहे. आमच्या गावातील एकही बालक असुरक्षित राहणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्न करू,” असे मत बाल पंचायतीच्या सदस्याने व्यक्त केले.
प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी कोरची आणि कुरखेडा येथील सदस्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. ग्राम पातळीवर काम करणाऱ्या या समित्याच खऱ्या अर्थाने बाल संरक्षणाचा पाया आहेत, असे प्रतिपादन अधिकाऱ्यांनी केले.
या अभ्यास दौऱ्यामुळे दोन्ही तालुक्यातील ग्राम बाल संरक्षण समित्या आणि बाल पंचाय्त समिती सदस्य अधिक सक्षम झाल्या असून, आगामी काळात ग्रामीण भागात बाल हक्कांच्या जनजागृतीला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.
या वेळी शैदूल टेकाम प्रकल्प समन्वयक ,वैशाली वानखडे जिल्हा समन्वयक ,माया कोचे तालुका समन्वयक ,महेश लाडे तालुका समन्वयक आणि रोषणा लाडे cader तसेच कोरची ,कुरखेडा तालुक्यातील vcpc सदस्य आणि बाल पंचायत सदस्य एकूण 18 व्यक्ती उपस्थित होते.
