खेळातून संघभावना, शिस्त व स्पर्धात्मक वृत्तीचा विकास होते….
सामाजिक कार्यकर्ते अभिजितभाऊ बंडावार यांचे प्रतिपादन…..
वायगाव येथे आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न….. अभिजितभाऊ बंडावार यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शिल्ड व मेडल देण्यात आले…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी…. चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथील भारतरत्न डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांचा उत्साह, आनंद व खेळाडूवृत्तीचा संगम पाहायला मिळाला. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण तसेच स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते, असे प्रतिपादन या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अभिजितभाऊ बंडावार यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक तुषार दुधबावरे, विशेष अतिथी म्हणून नगरसेविका अॅड.प्रेमाताई अमोल आईंचवार मॅडम, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक रविंद्र उराडे, तर अतिथी म्हणून संस्थेचे सचिव दत्तुजी मेश्राम,आर.एन.बंडावार, शिक्षक कालिदास बन्सोड, संदिप कोचे, संजय आलेवार, दुर्गेश वालदे, अभिषेक उत्तरवार, रजनी गेडाम मॅडम, आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गाईडच्या विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध संचलन करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. क्रीडा स्पर्धांमध्ये शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.
स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांना प्रथम पारितोषिक विजेत्या संघास शील्ड, द्वितीय पारितोषिक उपविजेत्या संघास शील्ड प्रदान करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेडल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान स्पष्टपणे दिसून येत होते.
यावेळी बोलताना प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक तुषार दुधबावरे आणि विशेष अतिथी अॅड. प्रेमाताई आईंचवार यांनी, खेळ हे केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच त्यांच्यामधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत नमूद केले.अध्यक्षीय भाषणात प्रभारी मुख्याध्यापक रविंद्र उराडे यांनी शाळेतील क्रीडा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगून सर्व शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप कोचे सर यांनी केले. त्यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश व विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड यांनी केले. तर आभारप्रदर्शन एस. बी.आलेवार सर यांनी करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या यशस्वी आयोजनामुळे वायगाव परिसरात क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास आयोजक क्रीडा शिक्षक कालिदास बन्सोड सर यांनी व्यक्त केले.
