
तलाठी संघटनेने केला निषेध.
चंद्रपूर:- सर्वसामान्य नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी, यासाठी राज्य शासनाने सर्व विभागांना 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच अधिका-यांना सुध्दा फिल्ड व्हीजीट करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.
याबाबत अधिकारी वर्ग प्रत्येक गावाना भेटी देत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे.तर एकीकडे भद्रावती तालुक्यातील शेगाव येथे तलाठी अनंत गीते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तलाठी गीते यांनी तक्रार दिली आहे.महसूल उत्पन्न वाढीत क्रमांक एक वर असलेल्या जिल्ह्यात सध्या वाळू तस्करांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू आहे, प्रशासनातील अधिकाऱ्यांसमवेत आर्थिक हित जोपासत हा व्यवसाय सध्या चांगला सुरू आहे.
30 जानेवारीला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास कारेगाव येथे तलाठी अनंत गीते व सहायक कोतवाल संजय लभाने व नितीन बुरचुंडे रेतीने भरलेला ट्रॅक्टर अडवीत परवाण्याबाबत विचारपूस केली, परवाना नसल्याने सदर ट्रॅक्टर हा भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले असता 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रॅक्टर चालकाला तलाठ्यांच्या अंगावर वाहन चालविण्यास सांगितले.
चालकाने वाहन तलाठ्यांच्या अंगावर चढविण्याचा प्रयत्न केला, तलाठी गीते वाहन समोरून न हटल्याने त्या 2 व्यक्तींनी तलाठी गीते सोबत धक्काबुक्की करीत त्यांना बाजूला सारले. त्यांनतर ट्रॅक्टर चालकाने वाहन सहित तिथून पळ काढला.या सर्व प्रकाराची माहिती गीते यांनी तहसीलदार राजेश भांडारकर यांना दिली. ट्रॅक्टर चालक व त्या दोन व्यक्तीविरुद्ध गीते यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या घटनेचा पटवारी संघाचे विभागीय अध्यक्ष राजूरकर यांनी निषेध करीत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.