
चंद्रपूर:- मुख्यमंत्री झाल्या नंतर प्रथमच चंद्रपूर शहरात आलोय आणि या दौ-याची सुरवात माता महाकालीच्या दर्शनाने होणे हा शुभसंकेत आहे. काम करत असतांना शक्तीचा आर्शिवाद महत्वाचा आहे. मातेची ईच्छा असेल तर ठरविल्या पेक्षा मोठे काम येथे होणार, आपण पाठपूरावा करुन मंदिर परिसर विकासाचा कार्यक्रम पुर्ण करु असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मा. सां. कन्नमवार रौप्य महोत्सव कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 जानेवारीला चंद्रपूर दौ-यावर होते. यावेळी भारतीय जनता पक्ष आणि श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे मुख्यमंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री यांनी माता महाकालीची आरती केली.