*नरसिंह भगवान जयंती उत्साहात; आमदार रामदास मसराम यांची उपस्थिती*
*कोरची:-* कुम्हार समाज, बोरी (ता. कोरची) यांच्या वतीने श्री नरसिंह भगवान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात आमदार मसराम यांनी भगवान नरसिंह यांच्या धर्मरक्षणाच्या कार्याचा उल्लेख करत समाजात ऐक्य, सद्भावना आणि प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक विकासासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी विविध समस्या मांडत आमदार मसराम यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रश्नांवर तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, जिल्हाध्यक्ष (छत्तीसगड) सुरजित ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, जिल्हा उपाध्यक्ष हकीमउद्दीन शेख, राजेंद्र चकधारी, संतराम चकधारी, किरपाराम चकधारी, झरनसिंग चकधारी, कार्यकर्ते रवी नंदेश्वर, सरपंच सावजी बोगा, उपसरपंच मीराबाई काटेंगे, पोलिस पाटील जयश्री दर्रो यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
