मनात जिद्द असेल तर कोणतेही यश दूर नाही.
NMMS परीक्षेत दारव्हा येथील नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4 मध्ये तीन विद्यार्थ्यांनी मारली बाजी.
दारव्हा(यवतमाळ):- आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4 या शाळेतील विद्यार्थिनी आराध्या दिनेश लाभसेटवार, चाहत परवीन इरफान खान आणी वेदात प्रविण उके या तीन विद्यार्थी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह संपूर्ण परिसराचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे या भागातील विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीची लाट निर्माण झाली असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
आराध्या तरोडा गावातून वेदात पांडुरना या गावातून चाहत दारव्हा इथून साधारण कुटुंबातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून शिक्षण घेत, अनेक अडचणींवर मात करत हे यश मिळवले. घरची परिस्थिती या सर्व आव्हानांवर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मात करत त्यांनी आपली क्षमता सिद्ध करून दाखवली. “मनात जिद्द असेल तर कोणतेही यश दूर नाही” हे या विद्यार्थ्यांने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
या यशामागे नगर परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4 मुख्याध्यापक संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षकवृंदाचा मोलाचा वाटा आहे. विशेषतः NMMS विभागाची जबाबदारी सांभाळणारे साबळे यांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा दिली. सातत्यपूर्ण सराव, नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी गाठली. तसेच विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याधिकारी विठ्ठल केदारेे, प्रशासन अधिकारी आकाश धवणे, नगराध्यक्ष सुनील चिरडे, शिक्षण सभापती वैशाली खाटीक, शाळा समिती अध्यक्ष प्रदीप धार्मिक यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
