*भारतरत्न डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यालय, वायगाव येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात*…
तालुका प्रतिनिधी चामोर्शी :- चामोर्शी तालुक्यातील येनापुर केंद्र अंतर्गत येणाऱ्या वायगाव येथील भारतरत्न डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यालयात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांपासून शिक्षकांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
मिलिंद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था, वायगावचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी राष्ट्रगीत गायन केले. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ साखरे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना शिस्त, परिश्रम आणि देशसेवेचे धडे दिले. तसेच शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन त्यांनी केले. आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची माहिती दिली.
ध्वजारोहण कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक संजय वाढई, जेष्ठ शिक्षक रवींद्र उराडे,स्काऊट शिक्षक कालिदास बन्सोड, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप कोचे, तसेच शिक्षक संजय आलेवार, दुर्गेश वालदे, अभिषेक उत्तरवार, रजनी गेडाम मॅडम यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. याशिवाय शाळेचे लिपिक पी. के. उंदिरवाडे, शिपाई राजेश वाटे, यादव पुच्छलवार आणि इतर शिक्षकेतर कर्मचारीही उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषवाक्ये दिली तसेच काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त मनोगत व्यक्त करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील शिक्षकवृंद विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
