राकेश तेलकुंटलवार तालुका प्रतिनिधी एटापल्ली
“मावा नार मावा शाळा” उपक्रमाला दमदार सुरुवात! एटापल्लीत केंद्रस्तरीय प्रशिक्षणाचा जल्लोष
एटापल्ली (दि. 4 मे 2026) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या “मावा नार मावा शाळा” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत केंद्रस्तरीय प्रशिक्षणाची एटापल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिवनगट्टा येथे पार पडलेल्या या प्रशिक्षणाला शिक्षक, प्रेरक आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
📌 शिक्षण उन्नतीसाठी एकत्र आले शिक्षक व प्रेरक
या प्रशिक्षण कार्यक्रमाला केंद्र प्रमुख कांभगोणीवर तसेच मुख्याध्यापक श्री. बुध्दावर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशिक्षणादरम्यान महेश पुलुरवार सर व श्री. दादाजी ओंधारे सर यांनी मार्गदर्शन करत उपक्रमाची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि अपेक्षित परिणाम यावर सविस्तर प्रकाश टाकला.
🎯 100 दिवसांचा विशेष शैक्षणिक उपक्रम
“मावा नार मावा शाळा” हा उपक्रम जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील गुणवत्तावाढ साध्य करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये 100 दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हा उपक्रम जिल्हा परिषद गडचिरोली, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
🏫 तीन दिवसीय प्रशिक्षणाला जोरदार प्रतिसाद
गट साधन केंद्र, पंचायत समिती एटापल्ली येथे गटशिक्षणाधिकारी मा. ऋषिकेश बुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. 4 मे 2026 पासून तालुक्यातील सर्व केंद्रांमध्ये तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, एकूण 303 प्रेरिकांसह शिक्षकांचा मोठा सहभाग नोंदवला जात आहे.
👥 गेदा केंद्रातही उत्साही सहभाग
प्रशिक्षणादरम्यान प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे विभागीय समन्वयक श्री. साईनाथ सलाम सर तसेच शिक्ष मित्र श्री. प्रकाश उसेंडी यांनी गेदा केंद्राला भेट देत मार्गदर्शन केले. येथे 27 शिक्षक व 30 प्रेरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
🌟 विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीचा विश्वास
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयातील कौशल्यात निश्चितच सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. “मावा नार मावा शाळा” हा उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षणासाठी नवा टप्पा ठरणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.
