
एटापल्ली येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा साजरा
एटापल्ली येथील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाचे वतीने एटापल्ली येथील विविध शाळेमध्ये “वाचन संकल्प महाराष्ट्राचा ” पंधरवडा साजरा करण्यात आला. दि. ०२ जाने २०२५ रोजी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्या तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या सदस्या तनुश्री ताई आत्राम यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनी व ग्रंथालय भेटीने या पंधरवड्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एस एन बुटे , प्रा.डॉ. एस.टी. भगत, प्रा. बि डी. कोंगरे, प्रा. डाॅ. आर. बी. डांगे, प्रा. बारसागडे प्रा. राहुल ढबाले , प्रा. सोनकांबळे प्रा. डाॅ दरेकर, प्रा. दुर्गे, प्रा डाॅ. वडस्कर इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचलन प्रा. डी. विनोद पत्तीवार यांनी केले. तर आभार प्रा. डॉ.भगत यांनी केले. तसेच या उपक्रमाअंतर्गत ९ जानेवारी ला राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथे व दिनांक 10 जाने. रोजी जिल्हा परिषद हॉयस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, एटापल्ली येथे तर ११ जानेवारीला भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रमशाळा एटापल्ली येथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा डाॅ संदिप मैंद प्रा चिन्ना पुंगाटी यांनी परिश्रम घेतले.