
एकरा येथे भगवंतराव महाविद्यालयाचे रासेयो शिबीर संपन्न
एकरा बु. दि.१६- *’रासेयो स्वयंसेवकाने एक जबाबदार नागरिक म्हणून मी समाजाकरीता काय करु शकतो याबाबत नेहमीच विचार करावा. विद्यार्थी दशेत असतांना मी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेत स्वयंसेवक म्हणून कार्य केले आहे. त्यावेळेस वृध्द लोकांना मेल कसा करावा(Digital Literacy) हे एका कार्यशाळेच्या माध्यमातून शिकविण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय सेवा योजनेत कार्य करतांना आपल्याला लोकसेवा कशी करता येईल या भावनेतूनच मला IAS करण्याची प्रेरणा मिळाली’*. असे प्रतिपादन मा. श्री नमन गोयल, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी केले.
भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे *युवा माझ्या भारतासाठी, युवा डिजिटल साक्षरतेसाठी* या विषयावर सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर मौजा एकरा बु. येथे दिनांक ११ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. त्या शिबीराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. डाॅ आदिनाथ आंधळे, संवर्ग विकास अधिकारी पं. स. एटापल्ली, मा. निलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी, एटापल्ली, मा. रविभाऊ रामगुंडेवार पत्रकार लोकमत तालूका प्रतिनिधी एटापल्ली, मा. साधुजी दुर्वा पोलीस पाटील एकरा यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे यांनी केले. संचालन प्रा डाॅ बाळकृष्ण कोंगरे यांनी केले. तर शिबीराचे अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डाॅ संदिप मैंद यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ विश्वनाथ दरेकार यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. सुधीर भगत प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा. डॉ शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ राजीव डांगे, प्रा. राहुल ढबाले,रासेयो कार्यक्रम अधिकारी डाॅ. श्रृती गुब्बावार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. चिन्ना पुंगाटी प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डॉ साईनाथ वडस्कर, प्रा. अतुल बारसागडे, श्री. श्रीनिवास दासरवार मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक. शाळा एकरा, श्री. मुनेश्ववर मोहुर्ले आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.