जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स.
दारव्हा (यवतमाळ):- काँग्रेस कार्यालयासमोर शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालया पासून तर कॉग्रेस कार्यालयापर्यंत मोर्चा काढून, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आम्ही सत्तेत आलो तर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना बंद करू. असं वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यालया समोर शिवसेनेच्या महिलांनी, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन केले. यावेळी अनेक शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या हाती फलक दिसून येत होत्या. फलकावर लाडक्या बहिणीच्या सावत्र भाऊ आमचे पैसे नको खाऊ, सुनील केदार यांचे करायचे काय, खाली मुंडंक वर पाय, लाडक्या बहिणीचे दृष्ट भाऊ आम्ही तुला निवडणुकीत हिसका दाखवू. अशा अनेक आशयाचे फलक महिलांच्या हाती दिसून येत होते. यावेळी कालीदी पवार, आशा डोंगरे, सुनीता राऊत, जयश्री दूधे, वैशाली खाटीक, सीमा चिरडे, दीपा सिंगची, शितल राठोड, शांता जाधव, मंगला निर्भते, जया लाभसेटवार, आश्विनी कुरशिंगे, व अन्य कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.