जयाताई लाभसेटवार
उपसंपादिका
इंद्रावती विदर्भ टाइम्स
दारव्हा (यवतमाळ):– संपूर्ण विदर्भात एकमेव असलेले यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल गाव म्हणजेच देऊळगाव वळसा या गावांमध्ये श्री व्याघ्रांगी देवी तथा महालक्ष्मी मंदिर असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महालक्ष्मी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.
दिनांक 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या महाआरती करिता तथा भक्ती निवास इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या आग्रहाखातर सैराट फेम रिंकू राजगुरू हे देऊळगाव वळसा या ठिकाणी येत असून महाआरती लोकार्पण सोहळा आणि सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात रिंकू राजगुरु यांची उपस्थिती राहणार असून त्यांच्या समवेत सौ शितलताई संजय राठोड तथा कुमारी दामिनी संजय राठोड हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे
विदर्भातील एकमेव असलेल्या महालक्ष्मी संस्थानला दिग्रस विधानसभेचे विद्यमान आमदार तथा मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी संस्थांच्या विकासाकरिता कधीही निधी कमी पडू दिलेला नाही या ठिकाणी भक्तांना सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून भक्ती निवास बांधण्यात आले असून सदर भक्ती निवासाकरिता तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत दीड कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर करून या ठिकाणी भक्तनिवास बांधण्यात आले असून या भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्याकरिता राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या समवेत मराठी चित्रपट अभिनेत्री सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरू हे विशेष आकर्षण राहणार असून सदर कार्यक्रमाला सौ शितल संजय राठोड अध्यक्ष मातोश्री महिला सखी मंडळ यवतमाळ त्याचबरोबर कु दामिनी संजय राठोड विदर्भ निरीक्षक व राज्य कार्यकारिणी सदस्य युवती सेना ह्या सुद्धा उपस्थित राहणार आहे या ठिकाणी तीन दिवसाचा यात्रा महोत्सव असून या यात्रा महोत्सवा दरम्यान झालेल्या विकास कामाचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायत देऊळगाव वळसाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत देऊळगाव वळसा यांनी केले आहे
तीन दिवस चालतो उत्सव
10 सप्टेंबर रोजी महालक्ष्मी देवीच्या मूळ स्थानावरून पालखी निघाली. ही नवीन मंदिरापर्यंत आणल्या जाते. मूळ स्थानावरून पालखी नवीन मंदिरामध्ये आल्यानंतर महालक्ष्मीची स्थापना करण्यात येते. त्याचप्रमाणे 11 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता होम हवन होणार असून दुपारी अकरा वाजता महाआरती आणि संध्याकाळी सहा वाजता महाआरती महाआरती होईल. 12 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते महाआरती होणार आहे.