जितेंद्र सहारे कोरची प्रतिनिधी
कोरची येथे शिवमहापुराण कथा मोठ्या उत्साहात संपन्न*
*दुबे महाराज यांच्या वाणीतून शिवमय झाले कोरचीवासीय*
*कोरची :-* शहरातील कवर समाज शिवधाम कोरची येथे नऊ दिवसीय संगीतमय अध्यात्मिक अमृतमय श्री शिव महापुराण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. छत्तीसगड राज्यातील भंडारीभरदा येथील कथावाचक श्री गुरुदेव दुबे महाराज यांच्या वाणीतून मागील नऊ दिवसांपासून शहरवासीय शिवमय झाले असल्याचे दिसून आले.
शिव महापुराण ची सुरुवात 17 डिसेंबरला कलश यात्रेपासून झाली. नंतर शिव महापुराण महात्मय, शिवलिंग प्रकट, शिवरात्री महात्मय, नारद मोह, कुबेर चरित्र, सती चरित्र, शिवपार्वती विवाह, गणेश बाललीला, वाणासूर कथा, बेलपत्र वर्षा आदि कथा दुबे महाराज यांच्या मुखाग्रातून नऊ दिवस भक्तांनी आस्वाद घेतला.
यावेळी शेवटच्या दिवशी महायज्ञ करण्यात आले तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शिव महापुराण कथेत भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली. यावेळी कवर समाज शिवधाम येथे नागरिकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
