जितेंद्र सहारे/ कोरची प्रतिनिधी
पारबताबाई विद्यालयातील विद्यार्थ्यांची रमण विज्ञान केंद्राची घेतली भेट*
*कोरची :-* येथील स्थानिक पारबताबाई विद्यालय शिक्षण घेत असलेले आदिवासी व ग्रामीण भागातील पाचवी ते दहावीच्या एकूण 56 विद्यार्थ्यांची विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी यांच्या मार्गदर्शनात शिक्षक वसंत गुरनुले ,शिक्षक सुरज हेमके यांच्या नेतृत्वात 23डिसेंबर ला नागपूर येथील विज्ञान रमण केंद्राला भेट देऊन विज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ,अवकाशीय तारामंडळ, आभासी संपूर्ण ग्रह प्रतिकृती, व 3डी शो, यांचे प्रत्येक्ष अनुभव घेतले.
त्याचबरोबर आदिवासी ग्रामीण भागातील मुलांना मेट्रो विषयी ज्ञान व्हावे याकरिता नागपूर नगरातील बर्डी ते एअरपोर्ट पर्यंत विद्यार्थ्यांना मेट्रोनी प्रवास करण्यात आले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथील प्रेक्षक गृहात जाऊन विमान कसे उडतात व कसे उतरतात याचे विलोभनीय दृश्य विद्यार्थ्यांनी अनुभवले. तसेच प्रसिद्ध पर्यटन स्थळ बौद्ध धर्माचे धार्मिक स्थळ दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतींना नमन करून त्यांच्या जीवनाविषयी संपूर्ण माहिती मिळवली. तसेच हिंदू धर्माचे स्वामीनारायण मंदिर येथे भेट देऊन येथील संपूर्ण कलाकृती बघून विद्यार्थ्यांनी त्या कलाकृतीचा ज्ञान मिळविला. त्याचबरोबर अंभोरा येथील पाच नद्यांचा संगम बघून त्याविषयी माहिती सुद्धा विद्यार्थ्यांनी मिळवली. यावेळी विद्यार्थ्यांसोबत विद्यालयाचे शिक्षक ,तुळशीराम कराडे, महेश चौधरी, जीवन भैसारे ,कृष्णामाई खुणे, निर्मला मडावी ,वैशाली अंबादे हे होते.
