
स्वातंत्र्यदिना निमित्त पेरमिली येथे ‘अमली पदार्थ विरोधी संकल्प रॅली’.
पेरमिली (गडचिरोली):–अहेरी तालुक्यातील उप पोलीस स्टेशन पेरमिली येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडंट महेंद्र कुमार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पो. निरीक्षक रणवीर सिंग, पो. उप निरीक्षक महाजन, पो. उप निरीक्षक कुटे तसेच जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफ चे जवान उपस्थित होते.
यानंतर पेरमिली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर अमली पदार्थ विरोधी संकल्प रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये जिल्हा पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफ जवान, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चांदेकर, शाळेतील कर्मचारी व गावकऱ्यांनी सहभाग घेतला. “अमली पदार्थांना नाही म्हणूया”, “नशामुक्त भारत घडवूया”, “अमली पदार्थ बंद करा – भविष्य सुरक्षित करा”, “जगण्यासाठी आरोग्य हवे – व्यसनांना दूर ठेवा”, “मला माझं आयुष्य हवे – नशा नको रे बाबा”, “तरुणाई वाचवा – अमली पदार्थ टाळा” अशा जोरदार घोषणा देत परिसरात जनजागृती करण्यात आली.
यावेळी पोलीस उप निरीक्षक दीपक सोनुने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा आणि समाजात जनजागृती करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.