*म.ज्यो.फुले हाय.तथा क. महा. आष्टी येथे संविधानाची पंचाहत्तरी निमित्त मार्गदर्शन*
महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टी या ठिकाणी अनुगामी लोकराज्य महाअभियान अंतर्गत आपल्या संविधानाची पंच्याहत्तरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाच भाई तसेच प्रमुख वक्ता म्हणून काशीनाथ चीचघरे व विनायक कुनघाडकर, पर्यवेक्षक डी बी घाटबांधे हे उपस्थित होते. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूलचे शिक्षक अंजली कोडमलवार, नंदा मिलमिले, सुशील अवसरमोल, व्यंकटरामन पोलोजी,संदीप पोरेड्डीवार, अंक्लेश रोहनकार अनिल पिसे, विनोद भूरसे, मान्तेश रत्नावर, शिक्षकेतर कर्मचारी मधुन लिपिक राजेश्वर बर्लावार, शिपाई लक्ष्मण दूरशेट्टी, बंडू दडजाम आणि योगेश दिवटेवार आदी कर्मचारी उपस्थित होते.सर्वप्रथम या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक कुनघाडकर यांनी संविधानावर अल्पशा मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रमुख वक्ता चीचघरे यांनी विद्यार्थ्यांसोबत संविधान या विषयावर सविस्तरपणे माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे संविधानाविषयी पूर्वज्ञान जागृत केले. व विविध प्रश्न उपस्थित करून सांगोपांग चर्चा केली. विद्यार्थ्यांना सुद्धा सविस्तर माहिती मिळाल्याचे समाधान झाले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य किशोर पाचभाई यांनी संपूर्ण दिलेल्या माहितीचा आढावा घेतला व त्यांनी सुद्धा संविधान महत्त्वाचे कसे आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंक्लेश रोहनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेशम अंबिलपू यांनी केले.
