भाजप नेते संजय पंदिलवार यांनी कॅन्सरग्रस्ताला केली आर्थिक मदत
आष्टी/प्रतिनिधी – चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील भाजप नेते संजय पंदिलवार यांनी कॅन्सरग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. संबंधित रुग्ण गेल्या काही महिन्यांपासून कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत असून त्याच्यावर महागडे उपचार सुरू आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उपचारासाठी निधीची मोठी अडचण निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात येताच भाजप नेते संजय पंदिलवार यांनी पुढाकार घेत तात्काळ आर्थिक मदत केली. तसेच इतर दानशूर व्यक्तींनाही मदतीचे आवाहन केले. या मदतीमुळे रुग्णाच्या उपचारांना दिलासा मिळाला असून कुटुंबीयांनी भाजप नेते संजय पंदिलवार यांचे आभार मानले.
यावेळी परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत गरजूंसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळाल्यास त्यांना नवसंजीवनी मिळू शकते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
