महापुरुषांच्या विचारातून समाज व व्यक्तिमत्वांची जडणघडण होत… कालिदास बन्सोड सर यांचे प्रतिपादन…
वायगाव येथील आंबेडकर विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी उत्साहात साजरी.. फोटो.. तालुका प्रतिनिधी चामोर्शी : भारतरत्न डॉ. बि .आर. आंबेडकर विद्यालय, वायगाव येथे महामानव, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात “महापुरुषांच्या विचारातूनच समाज व व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक कालिदास बन्सोड सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी शिक्षक रविंद्र उराडे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक कालिदास बन्सोड, तसेच शिक्षक एस .एम.कोचे, एस. बी. आल्लेवार, डी. एच. वालदे, उत्तरवार सर व गेडाम मॅडम यांची उपस्थिती होती.
आपल्या विचारमंथनातून कालिदास बन्सोड सर म्हणाले की, महात्मा फुले यांनी अंधश्रद्धा, विषमता, अन्याय आणि सामाजिक अत्याचाराविरुद्ध आयुष्यभर संघर्ष करत सामान्यांना शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यांच्या कार्याचा वारसा विद्यार्थ्यांनी धैर्याने, विचारांनी व समतेच्या मूल्यांनी पुढे नेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कोचे सर यांनी समर्थपणे केले, तर आभार प्रदर्शन उत्तरवार सर यांनी मानले. विद्यार्थ्यांनीही महात्मा फुले यांच्या कार्याविषयी विचार, कविता व भाषणांच्या माध्यमातून अभिव्यक्ती केली. कार्यक्रमामुळे सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते असलेल्या महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली.या कार्यक्रमास शिक्षक–विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
