
*जिवंत विद्यूत प्रवाह सोडून मौजा गिलगांव येथे “निलगाय” या वन्यप्राण्याची शिकार*
*आरोपी विरूध्द कुनघाडा वनपरिक्षेत्राची धडक कार्यवाही.*
*गडचिरोली*
उपवनसंरक्षक गडचिरोली वनविभाग गडचिरोली यांचे आदेशान्वये अवैद्य वन्यप्राणी शिकारी, अवैद्य वृक्ष तोड, तथा आगी पासून वन्यजिवांचे संरक्षणा करीता कुनघाडा वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी हे नियमीत दिवस – रात्र जंगल गस्त वाढवलेली असून नियमीत जंगल गस्त करण्यात येत आहे. अशातच नियमीत जंगल गस्ती दरम्यान गिलगांव नियतक्षेत्राचे वनरक्षक यांना मौजा गिलगांव येथील काही इसमांनी वनक्षेत्रा जवळील शेतात जिवंत विद्यूत प्रवाह सोडून “निलगाय” या वन्यप्राण्याची शिकार केली व त्यांचे मांस कापून, शिजवून खाण्याचे उद्देशाने घरी घेवून आणल्याची गुप्त माहिती मिळाली. सदरची माहिती प्रथम कु. एम. ए. तावाडे वनपरिक्षेत्र अधिकारी कुनघाडा यांना देण्यात आली आणि त्यांचे मार्गदर्शनात वनाधिकारी व पंच मिळून आरोपी अजय परशुराम मंटकवार रा. गिलगांव (जमि.) यांचे घरी जाऊन चौकशी केली असता त्यांचे घरी एका जर्मन गंजात वन्यप्राण्याचे शिजवलेले मांस आढळून आले. त्यावरून त्याला ताब्या घेवून अधिक चौकशी केली असता सदर शिकारी करण्याकरीता सोबत असलेल्या इतर 11 सहआरोपींची नांवे सांगितले. त्यानुसार इतर सर्व आरोपींना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेवून पंचासमक्ष जप्तीनामा व मोका पंचनाम नोंदवून त्यांना वनपरिक्षेत्र कार्यालय, कुनघाडा येथे आणून त्यांचे अधिक चौकशी केली असता त्यांनी “निलगाय” या वन्यप्राण्याची शिकार केल्याचे कबूल केल्यावरून त्यांचे विरूध्द वनअपराध क्रमांक :- 07686/192144(1) दिनांक 30.01.2025 अन्वये भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत वनगुन्ह्याची नोंद करण्यात आली. विशेष बाब म्हणजे कुनघाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे परिसरात नविन “वनकोठडी” चे बांधकाम करण्यात आलेले असून वरील नमूद सर्व आरोपींना नवनिर्मीत वनकोठडीत टाकून “वनकोठडी” चा शुभारंभ करण्यात आला.
आवश्यक सर्व कार्यवाही नंतर वरील सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना प्रथम श्रेणी न्यायालय चामोर्शी येथे हजर करण्यात आले तेव्हा मा. न्यायालयाने दिनांक 30.01.2025 ते 01.02.2025 पर्यंत “वनकोठडी” दिलेली असून या घटनेची चौकशी कु. एम. ए. तावाडे वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.