धम्म चक्र प्रवर्तन दिनी अहेरीत भीम रॅली.
अहेरी:- येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने शनिवार 12 ऑक्टोबर रोजी 68 वे धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आले.सकाळी पंचशील ध्वजचे ध्वजारोहण पुष्पा चांदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या नंतर सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
सायंकाळी शहरातून भीम रॅली काढण्यात आले. जय भीम व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोषणी अहेरी राजनगरी दुमदुमली. दरम्यान मुख्य चौकात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या रथाचे दर्शन घेऊन मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन केले आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाचे शुभेच्छा दिले. यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.