
अहेरी मतदार संघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्याना उपस्थित राहण्याचे आवाहन.
अहेरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार हनमंतू मडावी हे नामांकन अर्ज आज 29 ऑक्टोबर रोज मंगळवारला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार,माजी आमदार पेंटा रामा तलंडी यांच्या प्रमुख उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.
वासावी सेलिब्रेशन हॉल आलापल्ली रोड अहेरी येथून सकाळी ठिक 9 वाजता नामांकन अर्ज दाखल करण्या करिता उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाविकास आघाडी,इंडिया आघाडी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाजत – गाजत,ढोल – ताशाच्या गजरात फटक्यांच्या अतिषबाजी करत निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत.
अहेरी विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडी,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व तालुका अध्यक्ष,उपाध्यक्ष विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच आजी – माजी जिल्हा परिषद सभापती सदस्य – नगराध्यक्ष – उपाध्यक्ष – नगरसेवक – आजी -माजी पंचायत समितीचे सभापती उपसभापती सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य व अहेरी विधानसभा क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार आणि गडचिरोली जिल्हा आदिवासी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तथा उमेदवार हनमंतू मडावी यांनी केली आहे.