इंदिरा गांधी विद्यालय येनापूर ची विद्यार्थीनी कु. गौरी गावतूरे हिचे आर्चरी मध्ये सुयश
तालुका प्रतिनिधी चामोर्शी…
इंदिरा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येनापूर येथील वर्ग 8 वी ची विद्यार्थीनी कु. गौरी संदिप गावतूरे, जिल्हा स्तरीय धर्नुविधा प्रतिस्पर्धा (आर्चरी मध्ये आपले कौशल्य दाखवित कास्य पदक (Bronze Medal) पटकाविले तसेच वैयक्तीक स्पर्धेत रजत पदक (silver medal) पटकाविले व तिची सोलापूर येथे होणान्या राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
तिच्या या यशाकरीता विद्यालयाचे प्राचार्य दिलीप टेप्पलवार,पर्यवेक्षक वासुदेव गोंगले, प्राध्यापक डॉ.विठ्ठल चौथाले, प्रोपेश्वर लडके, कमलकिशोर कन्नाके, तथा सर्व शिक्षक शिक्षकेतार कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले वशुभेच्छा दिला देल्या. तसेच
गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ, येनापूरचे अध्यक्ष नागोबाजी पेदापल्लीवार ,सचिव जयंतराव येलमूले तथा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कु. गौरी संजय गावतूरे हिचे अभिनंदन करुन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
