*आश्रम शाळा कोटरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी*
कोरची :- जितेंद्र सहारे
कोरची तालुक्यापासून अंदाजे 15 किमी. अंतरावर असलेल्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे शिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित अनुदानित मासाहेब माध्यमिक आश्रम शाळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अधीक्षक मुकेश हरडे, प्राथमिक शिक्षक रमेश शहारे, माध्यमिक शिक्षक नमो मेश्राम,अरविंद काशीवार,सुधाकर कांबळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून आपली जीवनाची वाटचाल करावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील माध्यमिक शिक्षक नमो मेश्राम यांनी तर प्रास्ताविक शाळेतील प्राथमिक शिक्षक रमेश शहारे यांनी व आभार प्रदर्शन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी धनेश्वरी डोंगरी हिने मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशील मस्के,भूपेश कांबळी व प्रशांत काशीवार यांनी मोलाचे सहकार्य केले.
