राजमाता राजकुॅवरबाई प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळा चामोर्शी येथे रमेशजी राऊत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
तालुका प्रतिनिधी
चामोर्शी : येथील राजमाता राजकुॅवरबाई प्राथमिक तथा माध्यमिक आश्रमशाळेत कार्यरत असलेले जेष्ठ व कर्तव्यदक्ष शिक्षक रमेशजी राऊत यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाळेच्या वतीने भावपूर्ण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सन १९९७ पासून अखंडितपणे सेवा बजावणारे रमेश राऊत हे ३१ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ५८व्या वर्षी शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक यामावार होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते विकास रायसिडाम उपस्थित होते. यावेळी दुधबावरे सर, नाकाडे सर, मामेडवार सर, मासुरकर सर, कु. येनगंधेलवार मॅडम, कु. धुर्वे मॅडम, तितरे सर, गौरकार (लिपिक), पडालवारजी, कंबलवार सर, सहारे, कंकलवार, सोनटक्के, मुळे, जेंणठे, खोब्रागडे, पुठ्ठावार आदी शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाच्या प्रारंभी कु. येनगंधेलवार मॅडम यांनी प्रास्ताविकातून राऊत यांच्या २९ वर्षांच्या शैक्षणिक सेवांचा आढावा घेतला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण व सामाजिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी राऊत यांनी सातत्याने प्रयत्न केले.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक यामावार यांनी राऊत यांच्या प्रामाणिकपणा, वेळेचे भान आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेचा गौरव केला. प्रमुख अतिथी विकास रायसिडाम यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक म्हणून राऊत यांचा विद्यार्थ्यांवर झालेला सकारात्मक प्रभाव अधोरेखित करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती रमेशजी राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना शाळा, सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सेवाकाळात लाभलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मामेडवार सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन मासुरकर सर यांनी मानले. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभाने राऊत यांच्या दीर्घ व समर्पित सेवेला पुढिल आयुष्यासाठी सुभेच्छा देण्यात आल्या.
