अहेरीचे जावेद अली यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड..!!
अहेरी(गडचिरोली):– अहेरी राजनगरीतील युवा, तडफदार व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळख असलेले, गोर-गरीब जनतेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक कार्यकर्ते जावेद अली यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या अल्पसंख्याक विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांच्या हस्ते ही नियुक्ती दि. १९ जानेवारी २०२६ रोजी चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे, राष्ट्रीय प्रवक्ता तथा चायन समितीचे राष्ट्रीय नेते ज्ञानेद्र बिस्वास,
महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्रकाश गेडाम, विदर्भ अध्यक्ष आशिष पिपरे, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, अहेरी विधानसभा अध्यक्ष रियाज भाई शेख, जिल्हा सचिव प्रा. रतन दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
संपूर्ण विदर्भात मानवाधिकार क्षेत्रात प्रभावी कार्य करून वेगळी छाप निर्माण करणाऱ्या जावेद अली यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
