*समता फाउंडेशन मार्फत लखमापूर बोरी इथे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न*
लखमापूर बोरी :-
समता फाउंडेशन, मुंबई व शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र लखमापूर बोरी येथे शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर ला नेत्र तपासणी व मोतीबिंदू तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरात सहभागी झालेल्या 46 लाभार्थ्यांची नेत्र तपासणी नेत्र विशेषतज्ञ डॉ. आरती सातपुते व प्रांजल नागोसे यांनी केले. यात 15 मोतीबिंदू रुग्ण आढळून आले त्यांना बुधवार दिनांक 3 नोव्हेंबर ला शालिनीताई मेघे हॉस्पिटल रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपुर येथे नेत्र शस्त्रक्रिया करण्याकरिता पाठविण्यात येणार आहे, समता फॉउंडेशन मार्फत नियमित नेत्र तपासनी शिबीर घेऊन रुग्णाची मोफत शास्त्रक्रिया करून सहकार्य केले जाते.
शिबिराच्या यशस्वीतेकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र लखमापूर बोरी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर शुभम डूमपट्टीवार व तेथील कर्मचारी व समता फाउंडेशन मुंबईचे हेल्थ ऑफिसर सुरज कोकीरवार यांनी सहकार्य केले.
