जितेंद्र सहारे/ कोरची प्रतिनिधी
*पारबताबाई विद्यालयातील विद्यार्थांची क्षेत्रभेट*
*कोरची:-* येथील स्थानिक पारबताबाई विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थांनी क्षेत्रभेटी अंतर्गत शासकिय औधौगिक प्रशिक्षण संस्था कोरची ला भेट देऊन येथील सम्पूर्ण व्यवसाय प्रशिक्षण विषयी माहिती जाणून घेतली.शाळेचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र मडावी यांच्या मार्गदर्शनात शिक्षक सुरज हेमके , महेश चौधरी व निर्मला मडावी यांच्या नेतृत्वात औधौगिक प्रशिक्षण संस्थेला भेट दिली.
यावेळी औधौगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक घनश्याम पारधी यांनी या औधौगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या संपूर्ण व्यवसाय प्रशिक्षणविषयी सखोल मार्गदर्शन करून प्रत्यक्ष कश्याप्रकारे प्रशिक्षण दिले जाते या करीता प्रत्येक प्रात्यक्षिक खोली मध्ये नेऊन मार्गदर्शन करण्यात आले.औधौगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक हेमंत मरसकोल्हे यांनी वीजतंत्रि विषयी माहिती दिली.पेंटिंग या व्यवसाय प्रशिक्षण विषयी निदेशक पूर्णप्रतीक टेंभुर्ण यांनी सखोल मार्गदर्शन केले.सुतारव्यवसाय प्रशिक्षण विषयी बाबुराव नाईक यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.गणित व ड्रॉयिंग व्यवसाय प्रशिक्षण विषयी विनोद दाते यांनी मार्गदर्शन केले.एम्प्लॉयाविलिटि व्यवसाय प्रशिक्षण अनुपमा हटवावार यांनी मार्गदर्शन केले. तर फॅशन डिझायनिंग विषयी निदेशिका मोनाली राठोड यांनी मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले. फिडर ट्रेड विषयी विठ्ठल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
औधौगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशिका मोनाली राठोड यांनी दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्याना समजाऊन सांगितले.
क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यामधील ज्ञानात भर पडते.त्यांना महत्वपूर्ण बाबींविषयी माहिती मिळत असल्याने त्यांच्यात असलेल्या कौशल्यनुसार ते स्वयंप्रेरणेने स्वतः व्यवसाय प्रशिक्षण करून स्वतःचा रोजगार उपलब्ध करु शकत असल्यामुळे पुढील जिवनात त्यांचा उपयोग होतो.असे प्रतीपादन निदेशक विनोद दाते यांनी केले.
