
रस्ता बांधकामाच्या सुरक्षेकरिता तैनात होते जवान.
छत्तीसगड मधील बीजापूर जिल्ह्यातील घटना.
छत्तीसगड:- छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात आयईडी बॉम्बचा स्फोट झाल्याने सीएएफ दलाचा (CAF) एक जवान शहीद झाला. ही घटना सोमवारी 20 एप्रिल रोजी घडली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीएएफ १९ व्या बटालियनचे जवान मनोज पुजारी (२६) हे जिल्ह्यातील टोयनार आणि फरसेगड दरम्यान मोर्मेड गावाच्या जंगलात आयइडीचा बॉम्बच्या स्फोट झाल्याने जवान शहीद झाला आहे.
रस्ता बांधकामा दरम्यान गस्तीवर होते जवान.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टोयनार आणि फरसेगड दरम्यान बांधल्या जाणाऱ्या रस्त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीएएफ टीमला गस्तीवर पाठवण्यात आले होते. टोयनारपासून फरसेगडकडे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोर्मेड गावाच्या जंगलात जेव्हा हे पथक होते, तेव्हा सुरक्षा दलाचे जवान मनोज यांनी प्रेशर बॉम्बवर पाऊल ठेवले. यामुळे बॉम्बचा स्फोट झाला आणि तो शहीद झाला. पोलिसांनी हे नक्षलवाद्यांचे भ्याड कृत्य असल्याचे वर्णन केले आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरूच.
छत्तीसगडसह देशभरात नक्षलवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवादी जंगलात आणि पायवाटेवर प्रेशर बॉम्ब पेरतात. प्रेशर बॉम्ब स्फोटाच्या घटनेत अनेक जवान मृत्युमुखी पडले आहेत आणि अनेक जण जखमी झाले आहेत.