_*आदिवासी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन सोहळा संपन्न*_
*कोरची: जितेंद्र सहारे*
आदिवासी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा सेवा समिती बोदालदंड (मसेली) तालुका कोरची यांच्या वतीने आयोजित आदिवासी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण व समाज प्रबोधन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री. रामदासजी मसराम सर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा उल्लेख करत समाजाने शिक्षण व एकतेच्या मार्गाने पुढे जावे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला , काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मा. मनोजभाऊ अग्रवाल, माजी सभापती परसरामजी टिकले,मा. प्रतापसिंगजी गजभिये,मा. प्रा. अनिल होळी,रामसुरामजी काटेंगे, कचरीताई काटेंगे. मा. रमेश कोरचा सर, मा. पंचशिलाबाई बोगा, मा. धोकडेजी साहेब, मरस्कोल्हे सर, मडावी सर, मोहतुरे सर, बडोले मॅडम, डॉ. माळवी सर, मरस्कोल्हे सिस्टर, भुतांगे सर, ए. पी. डब्लू., सी. एल. हिडामी, क्रांतीदादा केरामी तसेच मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, ग्रामस्थ, युवक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
