जया लाभसेटवार
यवतमाळ/दारव्हा
यवतमाळ/दारव्हा:- आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार दिनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे दर्पण दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता, या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दारव्हा तहसीलचे तहसीलदार संजय जाधव, प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष जवळकर, ग्राहक पंचायत चे तालुकाध्यक्ष राजेंद्र ठाकूर ,ज्येष्ठ पत्रकार हनुमंत, राजेंद्र ,चिंता कुंटलवार , तसेच मुकेश चुडे महाराज ,मेजर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दर्पण दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यामध्ये आलेल्या प्रमुख पाहुण्यांना तसेच माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला तसेच पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघटना दारव्हा कडून गरिबांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.