गडचिरोलीच्या रज्जत वाळके यांचा UPSC मध्ये झेंडा — देशात ५१४ वा क्रमांक, जिल्ह्याचा गौरव
विजय वाडेट्टीवार व काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेट घेऊन सत्कार
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील वाळके परिवारातील सुपुत्र श्री. रज्जत वाळके यांनी संघ लोक सेवा आयोगाची (UPSC) अत्यंत प्रतिष्ठित व कठीण परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत देशात ५१४ वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
या यशाबद्दल आमदार विजयभाऊ वाडेट्टीवार (ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र) तसेच जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे यांनी रज्जत वाळके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी रज्जत यांच्या जिद्द, कठोर परिश्रम व चिकाटीचे कौतुक करत त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जि.प. सदस्य ॲड. रामभाऊ मेश्राम, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, नगरसेवक श्रीकांत देशमुख, नगरसेवक पराग पोरेडडीवार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नंदुभाऊ वाईलकर तसेच वाळके परिवारातील सदस्य उपस्थित होते.
रज्जत वाळके यांच्या या यशामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली असून, त्यांच्या यशाचा सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 💐
