मतुआधर्म महासम्मेलन व हरिनाम महायज्ञ कार्यक्रमास माजी जि.प. अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती
हरिचांद स्वामींच्या चरणी जिल्ह्यातील नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
अहेरी :
तालुक्यातील आलापल्ली येथे श्रीश्री हरिगुरुचाँद मतुआ मिशन शांती हरि मंदिर, चेकिंग नाका जवळील बजरंग चौक परिसरात सुपत मंडल यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदाही मतुआधर्म महासम्मेलन तथा हरिनाम महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या धार्मिक कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अजयभाऊ कंकडालवार तसेच आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हणमंतु मडावी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान डॉ. अजयभाऊ कंकडालवार व हणमंतु मडावी यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून हरिचांद स्वामींचे दर्शन घेतले. तसेच कार्यक्रमासाठी वर्गणी देऊन आयोजकांचे कौतुक केले.
यावेळी बोलताना डॉ. कंकडालवार यांनी “गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी व आनंदी जीवन लाभो,” अशी प्रार्थना हरिचांद स्वामींच्या चरणी केली.
या प्रसंगी दिलीप गंजीवार, उमेश चौधरी, प्रशांत गोडसेलवार यांच्यासह परिसरातील नागरिक तसेच स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
