अहेरी:- मौजा – कासमपल्ली, गुर्जा (बु.), वेडमपल्ली आणि एटापल्ली तालुक्यातील मौजा – कोंदावाही, बिड्री ते येमली या गावापर्यंत सरकारी बस सुरू करण्याबाबतची निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे यांच्या नेतृत्वात अहेरी आगाराचे वाहतुक निरीक्षक यांना निवेदन देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, मौजा – कासमपल्ली, गुर्जा (बु.), वेडमपल्ली, कोंदावाही, बिड्री, येमली इत्यादी गावातुन जाणारा रस्ता हे आता पक्का डांबरीकरण झालेला आहे. आणि सदर रस्त्यावरील सर्व नाल्यांवर पक्के पुलियाची सुध्दा बांधकाम पुर्ण झालेला आहे.
अहेरी पासुन ते येमली या गावापर्यंत जवळपास ५० कि.मी. ची अंतर आहे. आणि या परिसरात जवळपास २० ते २५ गावे आहेत. तरी त्या परिसरातील सर्वच गावातील नागरिकांना नेहमी इतर व शासकीय कामकाजा करिता तालुक्याच्या ठिकाणी यावा लागतो.
परंतु त्या परिसरातील नागरिकांकडे एसटी बसची सोय नसल्यामुळे ते कासमपल्ली पाटा पर्यंत पायी येवुन, बसची वाट पाहावी लागतो. आणि अनेकदा असेही होते की, अहेरीला उशीरा पोहचल्यामुळे त्या दिवशी त्याचा शासकीय कामकाज सुध्दा होत नसतो. म्हणुन शेवटी तो व्यक्ती निराश होऊन संध्याकाळी परत आपला गावी जातो. त्यामुळे अहेरी ते कासमपल्ली मार्गे येमली गावापर्यंत बस सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी निवेदन अहेरी आगाराचे आगार वाहतूक निरीक्षक यांनी स्वीकारले.निवेदन देतांना जोगा मडावी, तुकाराम ईश्टम, धर्म मडावी, देसु मडावी, गोविंद मडावी, नानु तलांडी, गिरमा कोडापे, रामजी तलांडे, मल्लेश मडावी, भीमराव तलांडे, नामदेव मडावी, श्रीनिवास मडावी सह परिसरात नागरीक उपस्थित होते.