जनसेवेची पताका उंचावणारे नेतृत्व; डाँक्टरेट सन्मानित अजयभाऊ कंकडालवार यांच्यावर पुन्हा विश्वास
शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी झटणारे सर्वसमावेशक नेतृत्व
अहेरी विधानसभा, प्रतिनिधी :
हातात ताकद आणि मनात लोकांसाठी अपार प्रेम हीच ओळख असलेले अजयभाऊ कंकडालवार आज अहेरी विधानसभा क्षेत्रात जनविश्वासाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव म्हणून त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचा मार्ग न मानता जनसेवेचे प्रभावी माध्यम बनवले आहे.
“जनसेवा हीच माधव सेवा” हा त्यांचा जीवनमंत्र असून तो त्यांनी आपल्या कृतीतून साकारला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीची धडपड असो किंवा गोरगरिबांच्या घरातील समस्या – अजयभाऊ प्रत्येक वेळी ठामपणे उभे राहिलेले दिसतात. शेतकऱ्यांना न्याय, विद्यार्थ्यांना संधी आणि सामान्य माणसाला आधार देणे हेच त्यांचे प्रमुख ध्येय राहिले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी विकासकामांना गती देत पारदर्शक आणि गतिमान कारभाराची छाप उमटवली. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शिक्षणविकास आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने पुढाकार घेत सर्वसमावेशक नेतृत्व सिद्ध केले.
राजकारणात अनेक संकटांचा सामना करताना विरोधकांकडून अडथळे निर्माण झाले, तरीही जनतेची साथ आणि विश्वास हेच त्यांचे खरे बळ ठरले. कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संवाद, जनतेच्या समस्या ऐकून तातडीने निर्णय घेण्याची तयारी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे.
आजही कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात एकच अपेक्षा आहे – आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाची पताका फडकावी.
अजयभाऊ कंकडालवार हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर जनतेच्या हक्कासाठी लढणारे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासाला नवी दिशा देणारे नेतृत्व आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी आणि लोकांप्रती असलेली निष्ठा यामुळेच ते सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवत आहेत.
