अहेरीत शुभमंगल वातावरण
गृहप्रवेश सोहळ्यात माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची विशेष उपस्थिती
अहेरी, प्रतिनिधी :
तालुक्यातील अहेरी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रदीप तलांडे यांच्या नव्याने बांधलेल्या घराचा गृहप्रवेश तथा वास्तूपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या मंगल प्रसंगी माजी आमदार तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी तलांडे कुटुंबीयांना भेटवस्तू देऊन नव्या घरासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
गृहप्रवेश सोहळ्यावेळी प्रदीप तलांडे, सौ. उज्वलाताई तलांडे, जुलेख शेख, सुधाकर कोरेत, लक्की आत्राम तसेच माजी सरपंच विजय कूसनाके आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी तलांडे कुटुंबीयांना शुभेच्छा देत आनंदोत्सवात सहभाग नोंदविला.
संपूर्ण कार्यक्रम आपुलकी, आनंद आणि मंगलमय वातावरणात पार पडला. गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.
