जिल्हयातील गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत
गो शाळामधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी
प्रती दिन प्रती पशु रु.50/- अनुदान
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 05 जानेवारी पर्यंत
गडचिरोली,(जिमाका),दि.31: जिल्हयातील गोशाळांना आर्थीक दृष्टया सक्षम करण्याकरीता सन 2024-25 पासुन गो शाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना रु. 50/- प्रती दिन प्रती गोवंश अनुदान देण्यासाठी योजना राबविण्यास शासन मान्यता प्राप्त आहे. सदर योजनेअंतर्गत अनुदानाच्या पात्रतेच्या अटीनुसार जिल्हयातील गो संगोपनाचा किमान 3 वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान 50 गोवंश व संस्थेतील ईअर टॅगींग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरापोळ व गोरक्षण संस्थेमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.
त्याकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 05 जानेवारी 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. सदर योजनेचे उददेश व स्वरुप, अनुदाना पात्रतेच्या अटी व शर्ती योजनेची अंमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इ. सविस्तर माहीती www.mahagosevaayog.org व http://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे- 16/12/2024 ते 05/01/2025, गोसेवा आयोगमार्फत प्राप्त अर्जाची प्राथमीकत पासणी- 06/01/2025 ते 10/01/2025, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती व्दारा प्राथमिक तपासणी अंती पात्र गोशाळांची प्रत्यक्ष भेट व पडताळणी- 11/01/2025 ते 20/01/2025, जिल्हा गोशाळा पडताळणी समीती अहवालानुसार अनुदानास पात्र गोधनांची संख्या आयोग कार्यालयास कळवीणे- 21/01/2025 ते 25/01/2025
तरी जिल्हयातील इच्छुक गोशाळा यांनी वर दिलेल्या वेळापत्रकानुसार ऑनलाईन अर्ज करण्यास डॉ.विलास अ. गाडगे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.
0000