*भिमपूर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम*
*कोरची :-* पंचशील नवयुवक मंडळ, भिमपूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार रामदास मसराम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानाच्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत, तरुणांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कोरची मनोज अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, प्रमिलाताई काटेंगे, माजी नगराध्यक्ष चौकी (छत्तीसगड) रितेश मेश्राम, तालुकाध्यक्ष बौद्ध समाज अशोक कराडे, विकास लांडगे, सरपंच कौशल्याबाई काटेंगे, पोलीस पाटील सिताराम काटेंगे, भैसारे सर, भगत सर, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतीबाई भैसारे, छाया साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमादरम्यान गावकऱ्यांनी विविध स्थानिक समस्यांबाबत आमदार मसराम यांना निवेदन सादर करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून यामुळे समाज प्रबोधनाला चालना मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
