शाळेत अंगावर लोखंडी गेट पडल्याने विद्यार्थिनी गंभीर जखमी
शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
*कोरची :-* आदिवासी बहुल असलेल्या कोरची तालुका मुख्यालयापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोहले येथे काल पूर्वसी मदन उंदीरवाडे (वय 6) ही पहिल्या वर्गात शिकणारी मुलगी शाळेतून बाहेर येत असताना तिच्यावर मुख्यद्वारातील लोखंडी गेट पडला.
यामुळे सदर चिमुकली रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळली व तिच्यावर जड गेट पडून होते सदर बाब निदर्शनास येतात पूर्वशी ला बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती केले. तिच्या नाकातून व कानातून सुद्धा रक्तस्त्राव सुरू झाल्यामुळे तिला प्राथमिक उपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
सदर मुलीच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या पायाचे हाड सुद्धा मोडले गेले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली
मुख्य म्हणजे चिमुकले शाळेत शिक्षण घेत असलेल्या शाळांची अशी वाईट व बिकट परिस्थिती ही धोकादायक असून यामुळे कधी पण अशा मोठ्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गांभीर्याची बाब म्हणजे सदर गेटची अवस्था अतिशय दयनीय व धोकादायक होऊन सुद्धा याकडे संबंधित विभागाने लक्ष का दिले नाही? असे खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शाळेतील मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस देण्यात आले आहे – अमित दास
मी स्वतः मुलीची ग्रामीण रुग्णालय कोरची येथे जाऊन तब्येतीची पाहणी केली व घटनास्थळी सुद्धा जाऊन चौकशी केली आहे तसेच शाळेचे मुख्याध्यापक हिराजी रामटेके यांना सुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे
अमित दास गटशिक्षणाधिकारी
*पंचायत समिती, कोरची