*कुकडेल येथे सावित्री बाई फुले जयंती व बालिका दीन साजरा*.
*कोरची:- जितेंद्र सहारे*
आज दिनांक ३ जानेवारी ला जिल्हा परीषद प्राथमिक शाळा कुकडेल येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दीन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थिनी कू.भावना नुरुटी, प्रमूख अतिथी विद्यार्थिनी कू.पलक नुरूटी तसेच शाळेचे मुख्याध्यापक अग्णू गोटा,सुचिता करंबे सहाय्यक शिक्षिका,विकास सहारे शिक्षक, आणि विघार्थी उपस्थित होते, मान्यवरांनी सावित्रीबाई फुले व बालिका दीन यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिण्य नंदेश्वर यांनी केले तर आभार कू.क्रिष्टी नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व मुलांचा सहकार्य लाभला व व्यवस्थितरीत्या कार्यक्रम पार पडला.