भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा- संगीता चांदेकर.
पेरमिली(गडचिरोली):– बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांचे जीवन सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी भेदभावाविरुद्ध लढा दिला. या दिवशी लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आणि त्यांनी भारतीय समाजात घडवून आणलेल्या बदलांची आठवण करतात. महापरिनिर्वाण दिन हा न्याय, समानता आणि निष्पक्षता या त्यांच्या मूल्यांवर विचार करण्याची संधी देतो. त्यांची शिकवण आजही भारताला प्रभावित करते. त्यांचे भाषण आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे मुद्दे अधिक समान आणि न्याय्य समाज निर्माण करण्याच्या त्यांच्या समर्पणाची आठवण करून देतात.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला सर्वात चांगली असे संविधान दिले आहे त्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना गरीब असो की श्रीमंत या सर्व नागरिकांना समानतेचा हक्क दिला आहे आणि त्याच माध्यमातून विद्यार्थी घरी गरीब की श्रीमंत शिक्षणासाठी कुठेही शिक्षण घेऊ शकतो. शिक्षणाच्या माध्यमातून मोठ मोठ्या पदाच्या नोकऱ्या सुद्धा या संविधानाच्या माध्यमातून घेत आहोत तसेच संविधान हा भारत देशाच्या रक्षण करीत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व विचार संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी पोहोचविलेला आहे.याच संविधानाच्या माध्यमातून आपण चांगले विचारसरणी ठेवून बाबासाहेबांचे विचारसरणी आत्मसात करावे. असे प्रतिपादन पेरमिली येथील सामाजिक कार्यकर्ता संगीता चांदेकर यांनी अहेरी तालुक्यातील तक्षशिला बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केले.
ध्वजारोहण लहानु चांदेकर, श्याम दहागावकर, अनिल मेश्राम, रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत दुर्गे, अविनाश कोंडागुर्ले, शुभम दहागावकर, देविदास दहागाकर, सुरेखा दुर्गे, गिरजा दाहागावकर, शकुंतला कोंडागुर्ले, शीला कुंभारे, कविता दुर्गे, वैशाली दुर्गे, निर्मला दहागावकर, लतिका दहागावकर, सुरेश कोंडागुर्ले, उद्धव दहागावकर, उमेश चांदेकर, शंकर कुंभारे, बंडू दहागावकर, महेंद्र दहागावकर, संदीप दुर्गे, सुभाष दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तुकेश कुंभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन भावना दुर्गे यांनी केले.
