एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्याचे नुतनीकरण किंवा दुरूस्ती करा
व्हाॅईस ऑफ मिडिया शाखा एटापल्ली यांचे कार्यकारी अभियंता सा.बा. उपविभाग एटापल्ली यांना निवेदन
राकेश तेलकुंटलवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली : तालुक्यातील जिल्हा मुख्यालयीन जाणारा एटापल्ली – देवदा-गडचिरोली या रस्त्याचे एटापल्ली ते देवदा पर्यंत खुप वाईट अवस्था आहे. तसेच एटापल्ली जारावंडी, हेडरी गट्टा या तीन प्रमुख मार्गाचे अंत्यत वाईट अवस्था आहे.या मार्गावर प्रवास करतांना दररोज अपघात होतात. अपघातात अनेकांनी आपले प्राण गमविले आहे अनेक जण गंभीर व किरकोर जखमी होत आहे. गर्भवती महिला व नवजात बालक यांना तालुका व जिल्हा रूग्णालयात पोहचवितांना जीव मुठीत ठेवून पोहचावे लागते. यात महिलाच्या च बाळाच्या जीवाला धोका असते. या साधनालयात रुग्णवाहिकेने नेतांना रुग्णवाहिकेत प्रसुती होते. तसेच आजारी वृध्द व्यक्तींना व इतर रूग्ण सुध्दा याच परिस्थितीचा सामना करावा लागतो.
या तिन्ही रस्तयाचे नुतनीकरण किंवा दुरूस्तीचे काम दोन महिण्याच्या आत सुरू न केल्यास 02 फेब्रुवारी 2026 पासुन सार्वजनिक बांधकाम कार्यालय समोर पत्रकार संघाचे सदस्याकडून साखळी उपोषण करणार आहे. असे कार्यकारी अभियंता सा.बा. उपविभाग एटापल्ली यांना दिलेल्या निवेदनात व्हाॅईस ऑफ मिडिया शाखा एटापल्ली यांनी म्हटले आहे
