राजू पोटवार यांनी आपल्या आई वडिलांच्या हस्ते शाळेला प्रिंटर व झेरॉक्स मशीन दिली भेट
चामोर्शी/भास्कर फरकडे
चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा कंन्सोबा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला मार्कंडा कंन्सोबा येथील या शाळेचे माजी विद्यार्थी तथा महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टीचे वरिष्ठ लिपिक राजू पोटवार यांनी आपले वडील
गावातील माजी सरपंच गंगाधर पोटवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला प्रिंटर व झेरॉक्स मशीन भेट देण्यात आले. शाळेतील शैक्षणिक कामकाज सुलभ व्हावे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही भेट देण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रिती कुबडे, ग्रामपंचायत सदस्य विजय बहिरेवार, राकेश तोरे, प्रशांत लोणारे व ग्रामस्थ उपस्थित होते. या शाळेचे माजी विद्यार्थी राजू पोटवार व गंगाधर पोटवार माजी सरपंचांच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या 61 असून एक मुख्याध्यापक व दोन शिक्षकांवर शिक्षणाचा भार आहे. करीता या शाळेला आणखी दोन शिक्षकांची आवश्यकता आहे या शाळेला दोन शिक्षक मिळाले तर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल आणि शाळा सुधारणेसाठी दडगेलवार शिक्षक यांच्या तळमळीने शाळा सुधारणा होत आहे पण शाळेला दोन शिक्षक अजून मिळाले तर आणखी शाळा सुधारणेसाठी दडगेलवार शिक्षकांना मदत होईल आणि जिल्ह्यातील एक नंबरची शाळा होईल असे उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त केले.
