जनार्दन नल्लावार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एकरा बु. येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन*
एटापल्ली – आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्थानिक भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय एटापल्ली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाव्दारे ‘विकसित भारतासाठी युवाशक्ती’ या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन समारंभ जि. प. प्राथमिक शाळा एकरा बु. येथे पार पडले.
उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एस. एन. बुटे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. राघव सुल्वावार, नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती, नगर पंचायत एटापल्ली यांच्या हस्ते रासेयोचे ध्वज फडकावून करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रविभाऊ रामगुंडेवार, तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत, श्री. श्रीनिवास दासरवार मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक. शाळा, एकरा, प्रा. डाॅ. सुधीर भगत, प्रा. डाॅ. बाळकृष्ण कोंगरे, प्रा. डाॅ. विश्वनाथ दरेकार, प्रा. डॉ. निलेश दुर्गे, प्रा. डॉ. राजीव डांगे, प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. राहुल ढबाले, प्रा. डॉ. साईनाथ वडस्कर, प्रा. डॉ. स्वाती तंतरपाळे, श्री. मुनेश्ववर मोहुर्ले तसेच बहुसंख्येने शिबीरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. श्रृती गुब्बावार यांनी प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. संदिप मैंद यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. चिन्ना पुंगाटी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली.
