
*५ जानेवारी रोजी तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन*
*लखमापूर बोरी:-
नेहरू युवा केंद्र गडचिरोली व शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोशिएशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी ११ वाजता चामोर्शी तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अ गट इयत्ता ५ ते १० वी साठी प्रथम पुरस्कार ५००१/ , द्वितीय पुरस्कार ३००१/ , तृतीय पुरस्कार २००१/ , ब गट इयत्ता ११ ते वरील प्रथम पुरस्कार ७००१/, द्वितीय पुरस्कार ५००१/, तृतीय पुरस्कार ३००१/ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्पर्धक चामोर्शी तालुक्यातील असावा, स्पर्धकांची संख्या बघून स्थानिक किंवा जवळच्या केंद्रावर सोय करण्यात येईल, स्पर्धा बहुपर्यायी असून, कालावधी दीड तासाचा असेल, स्पर्धा १०० प्रश्नांची प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असेल, नाव नोंदणीची अंतिम तारीख २ जानेवारी आहे, स्पर्धकांनी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे, आयोजकांचा नियम अंतिम व बंधनकारक असेल, सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल, संपूर्ण अधिकार आयोजन समितीकडे असतील. अशा प्रकारे नियम व अटी आहेत . जास्तीत जास्त स्पर्धकांनी नोंदणी करून प्रवेश नीच्छित करावा असे आवाहन आयोजन समितीचे रोशन कोहळे, अनुप कोहळे, दिलखुश बोदलकर, विलास चिचघरे, विनोद किरमे, जीवन भोयर यांनी केले आहे.