
नवरगाव येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा संघाच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन
भास्कर फरकडे उपसंपादक
इंद्रावती विदर्भ टाइम्स
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा संघाच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन दिनांक २८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत ७ दिवसाचे आयोजन करण्यात आले श्री ह भ प धर्मदासजी बन्सोड महाराज, लक्ष्मीकांत लांजेवार, अशोक कोरेती, हिरालाल बन्सोड महाराज, प्रल्हाद बोरकर, देवेंद्र ऊईके, यांच्या अमृतवाणीद्वारे श्रीमद् भागवत प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक २९ डिसेंबर ला गावात रामधुम पालखी काढण्यात आली व संध्याकाळी घटस्थापना करून हरिपाठ व सामुहिक ध्यान भागवत प्रवचन करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता दिनांक ३ डिसेंबर ला सावित्रीबाई फुले यांची १९४ वि जयंती निमित्त गावात रॅली काढून जयंती साजरी करण्यात आली व दुपारी गोपाळकाला करण्यात आला सदर कार्यक्रमाला माजी आमदार डॉ देवराव होळी, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी सभापती रमेश बारसागडे, आशिष पिपरे नगरसेवक नगरपंचायत चामोर्शी, खुशाल कुकडे सरपंच नवरगाव, डंबाजी खोडवे सरपंच नवेगाव, अनिल कुकडे ग्रामपंचायत सदस्य नवरगाव, नेताजी रायसिडाम उपसरपंच माल्लेर माल, मनोज चापडे उपसरपंच गिलगाव, व बाहेर गावाहून आलेले भाविक भक्त तसेच अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते